एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती.
.
थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला.
.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक वाचत बसली.
.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते.
.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
.
तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले.
.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला.
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!"
.
"माझ्या अंगी थोडी हिंमत असती,
तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!"
.
ती मनात विचार करत होती. 
.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते.
.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, 
का? 
मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
.
ती विचार करत होती.
“आता हे अतिच झालं,”
असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर
जाऊन बसली.
.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली.
.
पाहते तर काय, 

तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, 
याची तिला खूप लाज वाटली.
.
एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती.
.
तिने नजर टाकली, 
तर, 
शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
.

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; 
पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ???
.
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!!
.
"चांगली वस्तु"
"चांगली व्यक्ती" 
"चांगले दिवस"
यांची
"किंमत" 
निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत".
.
चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी समुद्र किनाऱ्यावर किंवा निवांत ठिकाणी शांतपणे आठवणींना घेऊन बसावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
.
आपल्याला कोण हवंय,
यापेक्षा 
आपण कोणाला हवंय 
हे सुद्धा कधीतरी पहावं.
आयुष्य खरंच जास्त सुंदर वाटत...
.
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, 
त्याच प्रमाणे,
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, 
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...😊😊😊
=============================
☘लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.
तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
  "आपण एक दाणा पेरला असता, 
  आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .
पण  निसर्गानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. 
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..,
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!
"पेरणी चालू आहे.."
     काय पेरायच हेआपलआपणच ठरवायच 
  🙏
======================================
🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹

       लक्षात ठेवावे असे.🙏

🌺◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत
केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
🌺◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
🌺◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील
टोपी काढावी.
🌺◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून
घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
🌺◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून
जाता येता किंवा गाडी जपू नये.
🌺◆ देवापुढे श्रीफळ (नारळ)
वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
🌺◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
🌺◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे
कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
🌺◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य
करू नये.
🌺◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून
तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
🌺◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने
आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
🌺◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व
देवी मंदिरात बासरी वाजू नये.
🌺◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी,
दुर्वा तोडू नयेत.
🌺◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास
वापरण्यास देवू नये.
🌺◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध
लावावे.
🌺◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न
पसरविता पंख्याने पसरावा.
🌺◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
🌺◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
🌺◆ निजलेल्या माणसास कधीही 
ओलांडून जावू नये.
🌺◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
🌺◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
🌺◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत
किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
🌺◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
🌺◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
🌺◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न
म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
🌺◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.
  👏👏👏👏👏👏👏👏
=============================================
 तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नये...
      .खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, 
जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..
     .एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता 
क्षणात "सुसंवाद" साधवा.
     ."अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण
  "बाळगुन जगू" नये..
       .शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, 
त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.
      .आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी 
याचे "स्मरण" ठेवू या.
       .आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा 
आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
    ."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" 
जागा करुन जाता आलं पाहिजे        
  🌺🌺शुभ सकाळ  🌺🌺

सुंदर विचार

जर तुमचे ध्येय साध्य होईल नसेल तर ते मिळवण्याची पद्धत बदला.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26......परफेक्ट गुरूमंत्र..
DEVELOP SELF-CONFIDENCE
(आत्मविश्वास विकास)
1. Empower smiling.
चेहऱ्यावर हास्य असू द्या
2. Relax yourself.
आरामशीर / तणावमुक्त रहा
3. Have a clear understanding.
आपले विचारात सुस्पष्टता असू द्या
4. Avoid misconceived thoughts.
गैरसमज / चुकीचे समज टाळा
5 Prompt decision - making.
तात्काळ निर्णयक्षमता
6. Avoid inferiority complex.
न्यूनगंड बाळगू नका
7. Believe yourself.
स्वतःवर विश्वास ठेवा
8. Be inspirational.
प्रेरणादायी रहा
9. Develop challenging attitude.
आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा
10. Be a positive thinker.
सकारात्मक विचार ठेवा
11. Have self – encouragement.
स्वयंप्रेरित रहा
12. Avoid procrastination.
चालढकल (दिरंगाई) टाळा
13. Learn lessons from others.
इतरांकडून प्रेरणा घ्या
14. Dont lose your spirit.
हिंमत / धीर सोडू नका
15. Think about time-use.
वेळेचे काटेकोर नियोजन करा
16. Be smart at all costs.
नेहमी चाणाक्ष रहा
17. Be a goal setter.
ध्येय निश्चित करा
18. Be punctual.
तत्पर रहा
19. Focus Involvement.
कामावर लक्ष केंद्रित करा
20. Possess mental alertness.
मानसिकरित्या तत्पर रहा
21. Sharpen your intelligence.
आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा
22. Try to be intellectual.
बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा
23. Be co-operative.
सहकार्याची भावना बाळगा
24. Avoid fearful feelings.
मनातील भीतीची भावना टाळा
25. Strengthen your will power.
आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या
26. Never bother about failure.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका 💐
=============================
बायको तुळशीला फेऱ्या घालणारी असावी,
.
.
.
.
.


तुळशी बागेला नको😆😂
============
😛 पुजा स्पेशल 😛

सासूबाई:- अगं सूनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे? 

नवीन सूनबाई:- पूजेसाठी 5 फळं मिळाली नाहीत तर Mix Fruit Jam वापरलाय..

सासुबाई चक्कर येउन पडल्या..
😂😂😝😝

 पूजा वही... सोच नयी... 😉😉
=========
घरातल्या घरात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राला बायको म्हणतात
😉😉
=====================
नवरा : अग कुठे चाललीस तू ?

बायको : दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !

नवरा : अग पण मोबाईल घेऊन ?

बायको : मग , बादली भरेपर्यंत काय करू ...............

नवरा :😷😷😷😷😷😷
==========================
दुःख वाटतं...जेव्हा
.
.
मित्राला रोज सकाळी दुधाची पिशवी  आणताना आणि कचरा टाकताना पाहतो.....😔😏
.
.
ज्याच्या लग्नात आम्ही आया है राजा या गाण्यावर डान्स केला होता....
😂😂😂
========================
पूर्वी आई म्हणायची-

माझा श्रावण बाळ...👶🏻


आता म्हणते-

बाळा...
किमान श्रावण तरी पाळ..
===================================
व्हाटसप म्हणजे कोंबडीचं 🐥🐥🐥खुराडच झालयं,

तासातासाला उघडून पहावं लागतय कोणी अंड दिलयं का?🐣🐣🐣🌕🌕🌕
========================
बंड्या :
मला आपल्या आयटमला कायतरी शॉल्लट
गिफ्ट द्यायचंय!...
.
पिंट्या : मग सोन्याची रिंग दे कि !!!
.
बंड्या : हे!!!!!..असलं बारीक काय नको!!....
एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!..
.
.

.
पिंट्या : मग MRF चा टायर दे कानात घालायला...
😜
========================
💫 सोडून द्यायला शिका...💫

माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍याची कागाळी करणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांच्या दुःखात आपले सुख मानणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणे.

☄ सोडून द्या :
दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहणे.

☄ सोडून द्या  :
दुसऱ्याची फालतू चौकशी करणे.

☄ सोडून द्या : 
दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे.

☄ सोडून द्या :
तुमचा खोटा अहंकार

☄ सोडून द्या :
स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे.

☄ सोडून द्या :
एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका-टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.

☄ सोडून द्या:
सगळ्या मित्र परिवारामध्ये मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकांना कमी लेखणे.

👉 लक्षात ठेवा.
आपण आपल्या लबाडी, स्वाथीॅ स्वभावाने लोकांना एक-दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकांना समजले की लोक आपल्यापासून दूर होऊ लागतात.

तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळते.
चांगलं द्या चांगलं मिळेल. वाईट दिले तर आज ना उद्या वाईट मिळेलच! 💐💐💐💐💐💐
             पहाटे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र... सदैव आनंदात राहा! 🌹🙏
तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,
"तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?"

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती 'हो' असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.

पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं, "नाही." 
 ती म्हणाली, "माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!"

तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, "मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते."

"मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे."

"कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल."

"आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते… माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे."

"त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना. माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय… मी आनंदीच असते!"

"मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन!
मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन!"

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते.
कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे!"

"माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे."

"माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता-वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो."

"…आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका."



वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा… आजारी असलात तरी आनंदी राहा… कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा… कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा.

तुम्ही स्त्री, पुरुष- कुणीही, कितीही वयाचे असा… असाच विचार करायला हवा; नाही का?🌼

🌺आनंदी राहा, आनंदात जगा!🌺
बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,

"कितीही झालंतरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो."

बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ??
😜😛😝😃
15 दिवस झाले
बाप अजुन पोराला मारतोय...😂😂
===========================================
एक बाई शेजारणीस- "वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?" 😳
शेजारीण- "हो, घेऊन  जा की, पण लवकर परत दया  आमचे  हे  देखील  थोडयाच  वेळात  येतील....."😬

अशा  प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला  गरम  गरम चपात्या वाढतात. 
👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तुम्हाला वेगळे विचार आले आसतील..सगळ्या बायका तशा नसतात. .
....

विचार  बदला देश  बदलेल.....!
😝😝😝😝
=================================================

गमतीदार संदेश

D ची गमत :-          

एक होती लेD.  
ती होती जाD.
तीने नेसली साD. 
पायात घातली जोD.  
बनवायची होती माD.    
तीने आणली शिD.  
वरून मारली उD. 
कारण ती होती वेD
============================
भारतीय बायकांचा नवीन डायलाॅग :
भाजी आणण्यापासून  पाकिस्तानला हरवण्यापर्यंत सर्व काही आम्हाला कराव लागत..
=========================
तरुण आहात तोपर्यंत एक तरी पाप करा..


नाहीतर म्हातारे झाल्यावर गंगेत जाऊन काय धुणार..


धोतर..

😂😝😀😜😆😛
=====================================
SSC बोर्डाचा निकाल जाहिर...!!

राज्यात सर्वात कमी निकाल नागपूरचा....!!😭😭

कारण....!!

फडणवीस साहेब एकटेच अभ्यास करतात,
कुणाला करुच देत नाहीत....!!
😜😜😜😜😜😜😂😂😂😂
========================================
आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?

१) मला संपत्ती नको..
२) मला बंगला नको..
३) मला नोकरी नको..
४) मला गाडी नको..
.
फक्त सगळ्या देवांनी 
एक एक  रुपया द्यावा. 😁😝😆😜


विषय संपला
=================================
आज्या: राहुल्या चल पावसात भिजायला 

राहुल्या : नको बाबा ऊगच 
आजारी पडायचो तुच जा बाबा 


तुमी काय सुधारणारच नाय 
तशीच चाल लावली आसणार 🤣

भीत्तुय वय कोणाला 

हाय का परत तसच वाचल आसणार 🤣

काय नाय होणार बगा तुमच 

झपाटून टाकलय मालीकेन या 

🕶 लागिर झाल जी🕶
===============================
आज आई आणि बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला  बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या  गुरु आहेत.🙏🙏💐
==========================
हा मेसेज हळूवारपणे वाचा, हसू नका 😂😂

जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.

जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.

कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.

काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अाधीच दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.

झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.

हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.

बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.

आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.

फ्रुटी पिऊन झाल्या नंतर  ने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.

चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.

जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.


ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"
😃😉
==========================================

झोपलेल्या राशि

झोपलेल्या राशि 

तारवटल्या डोळ्यांनी, 
बदलत रहातो कुशी 
अंथरुण भर लोळत लोळत, 
झोपते मेष राशि  ।।

कधी इथे झोप कधी तिथे, 
सवय त्याची अशी, 
खुट्ट होता ताडकन् 
उठते वृषभ राशि   ।।

जाडजुड गादी हवी 
पलंगपोस मऊ ऊशी, 
राजेशाही थाट, पाय -
चेपून घेते, मिथुन राशि  ।।

दंगा गोंगाट असो किती 
झोप यांना येते कशी, 
शांत गाढ माळरानीही 
घोरते निवांत कर्क राशि  ।।

आपलेच अंथरुण पांघरुण 
आपलीच तीच ऊशी, 
सावधान पोज घेऊनच 
निद्रा घेते सिंह राशि  ।।

दारे खिडक्या बंद करुन 
पुन्हा पुन्हा तपाशी, 
अर्धे नेत्र उघडे ठेऊन, 
झोपते कन्या राशि   ।।

दमसा भागता जीव म्हणे 
कधी एकदा आडवा होशी, 
ब्रह्मानंदी टाळी लागून, 
झोपी जाते तुळ राशि  ।।

एक मच्छर भुणभूण कानी 
कपाळावर बसली माशी, 
माझ्या नशीबी झोप नाही, 
म्हणते नेहमी वृश्र्चीक राशि  ।।

रात्रि जागरण विनाकारण 
आँफीसात डुलकी खुशाल घेशी, 
रित अशी ही उनाडटप्पू 
झोपली बघा धनू राशि  ।।

सगळं कसं वेळेवर 
जांभयी दहाच्या  ठोक्याशी, 
गजर नाही भोंगा नाही 
उठते वेळेत मकर राशि  ।।

शिस्तीत आपण रहायचं 
तक्रार नाही कशाची, 
जिथे जसे जमेल तशी, 
निद्रीस्त होई कुंभ राशि  ।।

हातपाय घुऊन येऊन 
प्रार्थना करून देवापाशी, 
दिनकर्माचा आढावा घेते 
सात्विकतेने मीन राशि   ।।

Motivational Thoughts

आपण जर आपलं जीवन बदलण्यासाठी कोणा माणसाचा शोध करत असाल तर एकदा स्वतःला आरशात पहा.

जे लोक आपले विचार नाही बदलवु शकत ते काहीच बदलू शकत नाहीत.

तुमच्या होणाऱ्या चुका तुम्ही करत असल्येल्या प्रयत्नाचा पुरावा देत असतात.

ज्या नजरेने आपण जगाला पाहतो त्याचं नजरेने जग आपल्याकडे पाहत असते.

जर तुम्ही महान होण्याचं स्वप्न पाहत असाल तर परवानगी घ्यायची सवय सोडा.

हिम्मत व प्रयत्न न सॊडता सतत धडपडत राहा....यश तुमच्या  कडे नक्की येईल

आई

आई :     हृदयाची हाक
आई :     निःशब्द जाग
आई :     गुंज अंतरीचे 
        आई :     नाव परमात्म्याचे ..?

         आई :     आई नसे केवळ काया
        आई :     आई ओंजळभर माया
    आई :     आई गगन भरारी 
         आई :     आई पंढरीची वारी ..?
आई :     दुधाळ सावली
   आई :     आभाळ माऊली
 आई :     एक अक्षयदान
  आई :     कर्णाचे दान...?
===========================================================
प्रेमाची सावली म्हणजे आई
कष्ट करुन लाड पुरवनारी आई
स्वःता उपशी राहुन खायला देनारी आई
पदराला हात पुसत सामभाळुन जा म्हणरी आई
सावलीत मर म्हणत जिव लावणारी आई
==================