प्रेरणादायी संदेश

आयुष्य कठीण अजिबात नसतं . .

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .
कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .
कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .
कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .
कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .
कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .
कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .
कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .
कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .
कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . 
कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो
. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??
ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि
उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते .
आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं
🌿🌼💐🌿🌼💐🌿🌼💐💐.
======================
अप्रतिम संदेश
पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. 

चिमणा - "सकाळी बोलूयात"
चिमणी - "हो"

रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.चिमणा उत्साहानी म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू.
"तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा - "अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत!चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...यालाच जगणे म्हणतात..

🌿🌼💐🌿🌼💐🌿🌼💐💐..
  🙏🙏  शुभ  सकाळ 🙏🙏 
===================
निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..
प्रश्न कधी-कधी कळत नाहीत
आणि उत्तर चुकत जाते..
सोडवताना वाटतं 
सुटत गेला गुंता..
पण प्रत्येक वेळी नवनवीन 
गाठ बनत जाते
दाखविणाऱ्याला वाट 
माहित नसते..
चालणाऱ्याचे ध्येय मात्र 
हरवून जाते..
दिसतात तितक्या सोप्या
नसतात काही गोष्टी..
"अनुभव"
म्हणजे काय हे तेव्हाच कळते...
असे मित्र बनवा 
जे कधीच साथ सोडणार नाही..
असे प्रेम करा 
ज्यात स्वार्थ असणार नाही..
असे हृद्य बनवा कि 
ज्याला तडा जाणार नाही..
असे हास्य बनवा
ज्यात रहस्य असणार नाही..
असा स्पर्श करा
ज्याने जखम होणार नाही..
असे नाते बनवा
ज्याला कधीच मरण नाही...
सुरेश भटांच्या चार सुंदर  
ओळी..
आयुष्य छान आहे, 
थोडे लहान आहे......
रडतोस काय वेड्या.? 
लढण्यात शान आहे...
काट्यातही फुलांची झुलती 
कमान आहे.....
उचलून घे हवे ते,
दुनिया दुकान आहे....
जगणे निरर्थक म्हणतो तो 
बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला 
पाण्यालाही उंचावरुनपडावं 
लागतं"...
========================
🌹 छान विचार🌹

पक्षी आकाशात हिंडताना 
त्यावेळी वाटा नसतात .
 प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते . त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा  जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच 
शोधावा लागतो .
   💐🌹शुभ सकाळ🌹💐

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
================

            ना कुणाशी स्पर्धा असावी,  ना कुणाचा द्वेष असावा, 
                  ना कुणाच्या पुढे 
           जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
       फक्त स्वतःला सिद्ध करण्याची 
                  जिद्द असावी...!!
             🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
=======================

पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील, 

पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.
          💝 शुभ सकाळ💝

   आपला दिवस आनंदी जाओ.
🌿🌼💐🌿🌼💐🌿🌼💐💐.
======================================
टेन्शन घ्यायचंच नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब(कर्म+संधी) कधी ही बदलु शकते...काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती, आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट देखील राहिलेला नाही...
एके काळी चहा विकणारा आज पृथ्वी प्रदक्षिणा घालत आहे..
आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्त्री दुकान असे कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटींचा मालक झाला...
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."  
     ⚜ जन्म पुन्हा नाही  ⚜
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
 तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात. 

     😄😄 नेहमी हसत रहा 😄😄
🌿🌼💐🌿🌼💐🌿🌼💐💐.
===============================================
||प्रेरणास्थान||
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची
किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.
....आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.. ..................
💐शुभ दिवस  💐
🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸