शुभ सकाळ संदेश

"रोज सकाळी  परमेश्वर या पृथ्वीवर सुख-दुःखाची नाणी फेकत असतो"
   ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात, तो सुखाचा व्यापार करतो.

 पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो, त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
  🌺 शुभ  सकाळ🌺
==================================

=========================
 तुम्ही कोणासाठी कितीही
          केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. 
          कारण सत्य चप्पल घालून 
          तयार होईपर्यंत, खोटं गावभर
             हिंडून आलेलं असतं.
    
 प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
         पण त्यांचा उद्देश फक्त  तुमची
         काळजी घेणं हाच असतो.

 जगातलं कटु सत्य हे आहे
          की  "नाती" जपणाराच  नेहमी
          सर्वांपासून दुरावला जातो..
  🌺 शुभ  सकाळ🌺
============
श्रद्धा ज्ञान देते
नम्रता मान देते
आणि
योग्यता स्थान देते
पण तिन्ही मिळाले तर
त्या व्यक्तिला दुनिया "सन्मान" देते

      ••●‼शुभ सकाळ‼●••
=====================
जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखु नका,
तुमच्या पेक्षा जास्त कुवत असुनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो याची जाणीव ठेवा….!

     🌺 शुभ  सकाळ🌺
========================
"प्रेम "आणि "मैत्री "
असे दोनच नाते आहेत की,
त्यांना नियमांची गरज नसते.
कोणी मनाशी
जुळलं की, "मैत्री" होते, आणि
कोणी मनात शिरलं की, "प्रेम."
ज्यांचं मन सुंदर असतं,
ज्यांचं ध्येय सुंदर असतं,
ज्यांचा विचार सुंदर असतो.
त्यांचं वागणं,
त्यांचं बोलणं, आणि
त्यांचं जगणेही सुंदर असतं.
 🌺 शुभ  सकाळ🌺
=========================
💖आयुष्याच्या चित्रपटाला 
           Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला 
           Download करता येत नाही. 
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍ 
            Delete ही करता येत नाही . 
कारण हा रोजचा तोच-तो असणारा 
             Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे  जगा कारण 
             Life हा चित्रपट पुन्हा लागणार  नाही. 
 🍀 शुभ सकाळ  🍀
========================
फुलामध्ये किडा सापडतो. दगडामध्ये"
 हीरा" सापडतो...वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा..
माणसा मध्ये ही "देव" सापडतो.. 
मी आपला मित्र आहे हे माझं "भाग्य" आहे..
पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ "परम भाग्य" आहे..
         जो" रुसतो" त्याला "हसवा."..जो हरवतो त्याला मिळवा"..😊          🌹🌺शुभ सकाळ 🌺🌹
==============================
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.🌟 *नाहीतर.
👍🌟तासभर साथ देणारी माणसं.
बस मध्ये पण भेटतात.
      🌟कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा🌟 बाजार मांडू नका. 🌟
         🌟कारण इथे प्रत्येक जण मतलबी🌟 ?🌟झालाय.
          🌟अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून🌟 विकत आणतात पण सुगंध आपल्या🌟 आवडीचा पाहतात.
  🌺🍃शुभ  सकाळ🍃🌺
==================================
रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील
       आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो,
तसच आपलं आयुष्य हे
                कधीतरी संपणार आहे
        ते अधिक सुंदर आणि
सुंदर जगण्याचा प्रयत्न करा!
      🌹 शुभ सकाळ 🌷
======================================
आई वडीलांचा  "हात"  पकडून ठेवा .... 
लोकांचे  "पाय" पकडण्याची गरज नाही पडणार.
ज्यांनी आपल्याला आपल्या  लहानपणी राजकुमारा सारख संभाळल , त्यांना त्यांच्या म्हातारपणी,  राजा सारख संभाळा.
लक्षात ठेवा:
ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.
*ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो तोच माझा भगवान आहे. 
      💐💐 शुभ सकाळ 💐💐
==================================
||देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव||
         ||जिवाभावाचे मित्र मात्र
     खुप सारे जमव ||
🌿🌴🌷नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,कारण 
पाणी कितीही घाण असले तरी 
ते तहान नाही पण आग विझवू शकते...🌹
"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे... लोकांच काय, लोक तर "देवात" पण चुका
काढतात...
🌺🌼 शुभ  सकाळ 🌼🌺
================================
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी....
    सा-या मनीच्या 
    तुमच्या इच्छा पुर्ण कण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच 
जीवनात यावी......
   तुमच्या प्रसन्न चित्ताने ती 
      खुलुन यावी..
आजचा हा दिवस तुम्हांला
      खुप खुप आनंदाचा जावो..😊

      🌸🌸🌸 शुभ सकाळ🌸🌸🌸
=============================
"मातीने" एकी केली तर विट बनते.., 
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते.., 
आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते. 
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, 
आपण तर माणसं आहोत...नाही का...
"विचार" असे मांडा की , 
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे. 

 🌸🌸🌸 शुभ सकाळ🌸🌸🌸
=============================
खरं बोलून मन दुखावल तरी चालेल...
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका...
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात...
तुम्ही  यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात...
   🌺🌺 शुभ  प्रभात 🌺🌺
🍁 आपला दिवस आनंदात जावो 🍁
==============================================
   देहाला आंघोळ पाण्याची ।
           मनाला आंघोळ नामाची ।
      वर - वर भक्ती नाही कामाची ।।
           सत्संगतीत सदा रहावे ।
          अंतर मुख होऊनी पहावे ।
     मनोभावे भगवंताचे पुजन करावे ।।
        जीवा - शिवाची जमेल जोडी ।
       मना लागेल तेव्हा नामाची गोडी ।
   सुंदर - सुरेख बसेल जीवनाची घडी ।।
 💐 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💐
==========================================
फक्त समाधान शोधा..

गरजा तर आयुष्यभर संपणार नाहीत..
💐 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💐
==========================
मनापासून जीव लावला कि...
रानातलं पाखरु सुद्धा... 
आवडीनं जवळ येत...
आपण तर माणूस आहोत...
 लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय... 
रिकाम्या हाताने जाणार...
असं कसं यार..
एक हृदय घेऊन❤आलोय
आणि जाताना लाखो  💗 हृदयात जागा करुन जाणार... 
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
==============================================
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत
नाही...
    कारण,त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर        
" विश्वास " असतो..

💐💐शुभ सकाळ 💐💐
================================
☄आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो....
|| शुभ सकाळ ||
===========================
आयुष्यात दोन व्यक्तींची
खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी
स्वत: आयुष्यभर हरत
राहिले ते - बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत
जिंकणं मानत आली ती - आई..

शुभ प्रभात  !!!
======================
सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!
इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!
आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
💐💐 शुभ सकाळ 💐💐
==============================
"मी ही चुकू शकतो
    हे एकदा मान्य केले की
     पुष्कळसे वाद आणि
     विरोध कमी होतात." 
  🌾🍁शुभ सकाळ🍁🌾
============================
😊एक सुंदर वाक्य
 शरीर जितकं फिरतं राहील
तेवढं स्वस्थ राहतं 
आणि
मन जितकं स्थिर राहील
तेवढं शांत राहतं.
  🌾🍁शुभ सकाळ🍁🌾
           =======================================
सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही..
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल...!
   💐🎍शुभ सकाळ🌹🌾     
============================
एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, 
पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज असते.
      🌺 || शुभ सकाळ || 🌺
=====================
ज्याच्याजवळ पवित्र तन, स्वच्छ मन, आणि निस्वार्थ 
असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी 
कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.
 💐💐 *शुभ सकाळ 💐💐
======================================
💐 ।। प्रभातपुष्प ।। 💐
            जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील ,. तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही !!!
 🌷 शुभ सकाळ🌷
==================================
रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
         बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
          परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
    इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
  परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते. 
           *म्हणून सकारात्मक  विचारांची उंची वाढवा ...     
आणि निश्चित ध्येय गाठा..

    🌻🌻 सुप्रभात 🌻🌻
=================================
   🍀नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या 
श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल 🍀
कारण जगात प्रेमाची कमतरता नाही,
कमतरता आहे ती फक्त नाती 
निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची
🌻🌻 सुप्रभात 🌻🌻
====================================
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, 
तो त्यालाच मिळतो; 
जो स्वत:ला विसरून 
इतरांना आनंदित करतो.

🍃🍃 || शुभ सकाळ ||🍃🍃
=============================
 💐🌹 नमस्कार 🌹💐
 जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत...
. एक आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो,
 त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही. 
जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, 
ते मन आपल्या ताब्यांत येत नाही हे दुसरें आश्चर्य. आणि
 क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात,
 पण तो सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय!  
💐🌹शुभ सकाळ🌹💐
===================================
पावसात जास्त भिजु नका...
कारण...
सायन्स ने प्रूव्ह केलय...
साखर पाण्यात विरघळते...
आणि...
तुम्ही...
साखरे पेक्षा " गोड " आहात!!!!
💐🌹शुभ सकाळ🌹💐
==================================
       💞 'मन' ओळखणारयांपेक्षा मन जपणारी  माणसं हवीत
कारण, 
ओळखणारी ही  क्षणभरासाठी असतात तर जपणारी 
आयुष्यभरासाठी!!! 
      🍀 शुभ सकाळ 🍀
==================================
   चांगले कुटुंब आणि जीवाला जीव 
देणारे
मित्र भेटणे म्हणजे 
दुसर काही नसून जिवंतपणीच

मिळालेला स्वर्ग आहे ..
🍀 शुभ सकाळ 🍀
=============================
प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, 
मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. 
शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे,
 शब्द माणुसकीचा ठेवा आहे. 
माणसाला सुंदर  दिसण्यासाठी 
         सुंदर असणं महत्वाचं नसतं
          तर महत्वाचं असतं ते सुंदर नि  
          तितकचं निरागस मन आणि त्यावर
जर निर्मळ  हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही !!
🌹  शुभ सकाळ 🌹
==================================
"शुभसकाळ"
   म्हणजे केवळ
  शुभेच्छा देण्याची 
 औपचारीकता नव्हे ...
  तर
 दिवसाच्या सुरुवातीच्या
पहील्या मिनीटाला मी तुमची
काढलेली सुदंर " आठवण "
🍁🌼शुभ सकाळ🌼🍁
==================================
एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभी ! तिची आई हसतहसत म्हणाली,"बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात तिने तो पेरू दाताने कुरतडला.तिची आई काहीच बोलली नाही. मुलीने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या मुलीची ही कृती बघून तिची आई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या मुलीने चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाली, "आई, हा घे.हा जास्त गोड आहे." आईच्या डोळ्यात पाणी आले. 😊😊
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही...

एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून *गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असत..
🍁🌼शुभ सकाळ🌼🍁
======================================
" स्वर्गात सर्व काही आहॆ,परंतु मृत्यू नाही,
       गीतॆमध्यॆ सर्व काही आहे,परंतु खोटं नाही,
  " जगात सर्व काही आहे,परंतु समाधान नाही,
        आणि "आज माणसांमध्ये सर्व काही आहे„
               परंतु धीर नाही.••☜
    " जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो„
           आधार कुणी नाही देत परंतु••☜
           धक्का द्यायला प्रत्येक जण तयार     
                 असतो.. . .
             “माझं” म्हणून नाही.••☜
        ”आपलं” म्हणून ‘जगता’ आलं पाहिजे…
           ‘जग’ खुप ‘चांगले’ आहे. ••☜
 फक्त ………”चांगले वागता” आलं पाहिजे..!!
     🌞🌞शुभ सकाळ🌞🌞
===============================
जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशीबात लिहिलय
ते नक्कीच मिळणार
पण
विश्वास स्वःताचा स्वःतावर असेल ना
तर देव सुध्दा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे..
   🌞🌞शुभ सकाळ🌞🌞
=================================
सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,
       शपथेची गरज नसते...
          नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,
            रस्त्याची गरज नसते...
              जे आपल्या हिंमतीच्या,
               जोरावर जीवन जगतात...
         त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,
        कुठल्याही रथाची गरज नसते...!!!
🌞🌞शुभ सकाळ🌞🌞

  💐आपला दिवस अतिसुंदर जावो...!!!💐
==============================================